महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Drugs case : नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचा जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीची मुंबई उच्च न्यायालयात धाव - Drugs case

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ( Nawab Malik's son-in-law Sameer Khan's case ) विशेष न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात धाव ( NCB in Mumbai High Court over Sameer Khan case ) घेतली आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात नऊ महिने अटक राहिल्यानंतर विशेष न्यायालयाने समीर खानला जामीन मंजूर केला होता.

Drugs case
समीर खान

By

Published : Jan 1, 2022, 7:38 PM IST

Updated : Jan 1, 2022, 10:19 PM IST

मुंबई -राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ( Nawab Malik's son-in-law Sameer Khan's case ) विशेष न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात धाव ( NCB in Mumbai High Court over Sameer Khan case ) घेतली आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात नऊ महिने अटक राहिल्यानंतर विशेष न्यायालयाने समीर खानला जामीन मंजूर केला होता.

एनसीबीने अधिवक्ता श्रीराम शिरसाट यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि दावा केला की विशेष न्यायालयाचा आदेश त्रुटीसह आहे आणि म्हणूनच तो रद्द करून बाजूला ठेवावा. उच्च न्यायालय केंद्रीय एजन्सीच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई जुन्नर डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर एनसीबीने समीर वानखेडे तपास करत असलेल्या तीन प्रकारात दिल्लीतील एनसीबी SIT कडे दिले होते. त्यातील प्रकरणांपैकी समीर खान हे प्रकरण आहे. या प्रकरणासोबतच आर्यन खान प्रकरणाचा देखील तपास दिल्लीतील एनसीबी एसआयटी करत आहे.


विशेष न्यायालयाने सहआरोपी राहिला फर्निचरवाला आणि करण सेजनानी यांनाही जामीन मंजूर केला होता. सेजनानीच्या अटकेनंतर एनसीबीने गेल्या वर्षी 14 जानेवारी रोजी समीर खानला अटक केली होती. ज्यांच्याकडून केंद्रीय एजन्सीने दावा केला होता की व्यावसायिक प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले होते.


समीर खान यांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये जामीनही मागितला होता. पण तपास सुरू असल्याने विशेष न्यायालयाने तो फेटाळला होता. जुलैमध्ये एनसीबीने आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर खान आणि इतरांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला. एनसीबीने म्हटले होते की आरोपींनी 194.6 किलो गांजा आणि सहा सीबीडी फवारण्या खरेदी, विक्री, खरेदी आणि वाहतूक करण्याचा कट रचला होता.


काय आहे प्रकरण?

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. या प्रकरणी त्यांची चौकशी झाली. त्यानंतर 14 जानेवारी रोजी समीर खान यांना एनसीबीने अटक केली होती. नऊ महिन्यानंतर समीर खान यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

एनसीबीच्या या पवित्र्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी उद्या दि. २ जानेवारीला पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करुन स्पष्ट केले आहे. सकाळी ११ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. एनसीबीच्या आणखी काही चुकीच्या गोष्टी उघड करणार असल्याचे त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

हेही वाचा -Nitin Gadkari Shopping :...आणि नितीन गडकरी नातवांच्या खाऊसाठी पोहोचले दुकानात; व्हिडीओ व्हायरल

Last Updated : Jan 1, 2022, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details