महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंडरवर्ल्ड डॉन अनिस इब्राहिमचा खास हस्तक केआर एनसीबीच्या रडारवर

एनसीबीने अटक केलेल्या आरीफच्या कबुलीजबाबात मध्ये त्याने कैलास राजपूत याची दुबईत जाऊन अनेक वेळा भेट घेतलेली आहे. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. आता त्याची पडताळणी एनसीबी पथक करत आहे. कैलास राजपूत हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, डीआरआय मुंबईच्या वॉन्टेड लिस्ट मध्ये आहे.

अनिस इब्राहिमचा खास हस्तक केआर एनसीबीच्या रडारवर
अनिस इब्राहिमचा खास हस्तक केआर एनसीबीच्या रडारवर

By

Published : Jan 27, 2021, 11:01 AM IST

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक असलेल्या चिकू पठाण याला एनसीबीने अटक केली. त्यानंतर यासंदर्भात फरार असलेल्या आरिफ भुजवाला याला रायगड पोलिसांच्या मदतीने रायगड जिल्ह्यातून एनसीबीच्या पथकाने अटक केलेली आहे. आरीफच्या चौकशीत कैलास राजपूत हा आता रडारवर आला आहे.

कोण आहे कैलास राजपूत

एनसीबी कडून आरिफ भुजवाला याची चौकशी केली जात असताना त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या अनिस इब्राहिम याच्यासाठी काम करणाऱ्या कैलास राजपूत उर्फ केआर हा दाऊदचा अमली पदार्थांचा कारभार यूएई मधून चालवत आहे. एनसीबीने अटक केलेल्या आरीफच्या कबुलीजबाबात मध्ये त्याने कैलास राजपूत याची दुबईत जाऊन अनेक वेळा भेट घेतलेली आहे. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. आता त्याची पडताळणी एनसीबी पथक करत आहे. कैलास राजपूत हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, डीआरआय मुंबईच्या वॉन्टेड लिस्ट मध्ये आहे.


दहशतवादाला केला जात होता आर्थिक पुरवठा

आतापर्यंतच्या तपासानुसार मुंबईतून अमली पदार्थांच्या माध्यमातून दहशतवादाला आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे समोर येत आहे. दाऊदचा खास हस्तक चिंकू पठाण , आरिफ भुजवाला हे इतर अमली पदार्थ तस्करांसोबत मिळून मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास 1500 कोटी रुपयांचे ड्रग्स मुंबई शहरात विकले गेल असून हवालामार्गे हा पैसा परदेशात पाठवण्यात आल्याचेही समोर आलेले आहे.

आतापर्यंत या प्रकरणामध्ये डोंगरी परिसरातील चार ठिकाणी धाडी मारण्यात आल्या असून 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईत विकले जाणारे अमली पदार्थ व दहशतवादाला हवालामार्गे होणारा आर्थिक पुरवठा लक्षात घेता आता यापुढे जाऊन सीबीआय, ईडी देखील यामध्ये तपास करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details