मुंबई-मुंबई नार्कोटेस कंट्रोल ब्युरोने अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक मोहीम ( Mumbai NCB crackdown on drug traffickers ) सुरूच आहे. खोपोली परिसरात गुरुवार 1 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 210 किलोग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला ( NCB seized 4 Crores Ganja Mumbai ) आहे. या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात चार कोटी रुपये इतकी किंमत असल्याचे माहिती मिळाली आहे. एका वाहनासह एका आरोपीला ताब्यातही घेण्यात आले आहे. समीर वानखेडे यांच्या बदलीनंतर नवीन आलेले मुंबई झोनल डायरेक्टर यांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोहीम ( Mumbai NCB campaign against drug traffickers ) सुरूच ठेवली आहे. यापूर्वी देखील गेल्या दोन महिन्यात मुंबई एनसीबी कडून करोडो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात ( Mumbai NCB seized drugs worth crores of rupees ) आले आहे.
गांजाच्या मोठ्या खेपच्या वाहतुकीचा होता बेत -NCB मुंबईने 1 सप्टेंबर रोजी खोपोली येथे 4 कोटी रुपयांचा 210 किलो गांजा जप्त केला. एका तस्करासह वाहनही एनसीबीनं जप्त केलेय. जप्त करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या गांजाची मोठी खेप मुंबई आणि लगतच्या भागात नेली जात होती. टक करण्यात आलेला व्यक्ती हा मुंबईचा प्राथमिक रहिवासी असून तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या विविध भागात विशेषतः गोवंडी, मानखुर्द आणि इतर स्थानिक भागात गांजा आणि इतर अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. एनसीबीने एपी ओडिशा भागातून मुंबईला आणलेल्या मोठ्या मालाची डिलिव्हरी जप्त करून कारवाईचा काम केले होते. प्रतिबंधित वस्तूंची डिलिव्हरी पुण्याजवळ काही ठिकाणी करायची होती आणि ती मग पुढे गोवंडी, मुंबईला करायची होती. एनसीबीच्या पथकाने तस्करांच्या हालचालींची अधिक तपासणी केली. पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणार्या तस्कराचा आणि वाहनाचा योग्य वेळी माग काढण्यात आला.