मुंबई - क्रूझ पार्टी डिलप्रकरणी सॅम डिसुजाला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहे. आज चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे.
या प्रकरणातील प्रभाकर साईलने याबद्दल काही आरोप केलेले आहेत.
तब्बल 8 तास जबाब नोंदवण्यात आला
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण मिटवण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलने रात्री उशिरा मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला. मुंबई पोलिसांच्या झोन एकचे डीसीपी कार्यालयात जबाब नोंदविण्यात आला आहे. तब्बल 8 तास जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल हा पंच असून किरण गोसावीचा अंगरक्षक आहे.
किरण गोसावीचा वैयक्तिक अंगरक्षक
ड्रग्ज प्रकरणी खटला निकाली काढण्यासाठी 25 कोटींचा सौदा झाल्याची चर्चा ऐकल्याचा दावा प्रभाकरने केला आहे. त्यापैकी 18 कोटींचा करार होणार होता. तर 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. किरण गोसावी हा व्यवसायाने गुप्तहेर असून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा साक्षीदारही आहे. सध्या किरण गोसावी हा फरार आहे. प्रभाकरने सांगितले की, तो किरण गोसावीचा वैयक्तिक अंगरक्षक म्हणून काम करतो. क्रूझ पार्टीच्या छाप्यावेळी ते गोसावी यांच्यासोबत होते. या घटनेनंतर किरण गोसावी गूढपणे गायब झाल्यापासून त्याच्या जीवाला धोका असल्याचे प्रभाकर सांगतात.
18 कोटींमध्ये फिक्स करण्यासंबंधी सॅम नावाच्या व्यक्तीशी बोलत होते
प्रभाकरने आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, त्याने एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसोझा यांची भेट घेतली. त्यावेळी ते के.पी.गोसावी यांना भेटण्यासाठी आले होते. लोअर परळजवळील बिग बझारजवळील एनसीबी कार्यालयातून दोघेही आपापल्या कारमध्ये पोहोचले. 18 कोटींमध्ये फिक्स करण्यासाठी गोसावी हे सॅम नावाच्या व्यक्तीशी 25 कोटी रुपयांवरून फोनवर बोलत असल्याचा दावा या शपथपत्रात करण्यात आला आहे. समीर वानखेडेला 8 कोटी रुपये देण्याचेही त्यांनी बोलले आहे.
हेही वाचा -क्रांती रेडकर मराठी मुलगी, तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे - संजय राऊत