मुंबई -कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्याकरिता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) दोन विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहेत. ही दोन्ही पथके सोमवारपासून अॅक्शन मोडमध्ये असणार आहेत. आर्यन खान ड्रग्ज केस आणि समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी ही पथके करणार आहेत. या दोन्ही पथकांमध्ये एकूण 20 सदस्य आहेत. त्यापैकी आर्यन खान प्रकरणासह इतर सहा प्रकरणांचा तपास 13 अधिकारी करणार आहेत. तर दुसऱ्या पथकात सात अधिकारी असतील आणि ते एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी करणार आहेत.
संजय सिंह आज मुंबईत -
आर्यन खान प्रकरणासह इतर पाच प्रकरणांचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या एसआयटीमध्ये एकूण 13 जण आहेत. यांचे नेतृत्व डायरेक्टर जनरल संजय सिंह करणार आहेत. संजय सिंह हे आज (सोमवार) सकाळी दिल्ली विमानतळावरुन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यांच्या पथकामध्ये एक ॲडिशनल डायरेक्टर, दोन एसपी, आणि इतर 10 अधिकारी असणार आहे. हे पथक आर्यन खान प्रकरणासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांचे जवाई समीर खान यांच्या प्रकरणाची देखील चौकशी करणार आहे.
आर्यन खान प्रकरणामध्ये आतापर्यंत ज्या कुणाचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. त्या सर्वांचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या प्रकरणातील पंचांचा देखील जबाब एसआयटी घेणार आहे. ज्या प्रमाणात या प्रकरणात मुंबई एनसीबीवर आरोप करण्यात आले, त्या आरोपांची चौकशी या स्पेशल एसआयटी मार्फत करण्यात येणार आहे. आर्यन खान प्रकरणासह समीर खान यांच्या प्रकरणाची देखील एसआयटीने काल सर्व कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले आहेत. सर्व कागदपत्राची पाहणी एसआयटीकडून सुरू आहे. मात्र तरी उद्या खऱ्या अर्थाने एसआयटी आपल्या तपासाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय नवीन वळण येते हे पाहावे लागणार आहे.
सात सदस्य करणार वानखेडेंवरील आरोपांची चौकशी -