मुंबई -आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. यानंतर मुंबईतील 6 स्पेशल केसचा तपास स्थापन केलेली दिल्लीतील एनसीबीची एसआयटी टीम करणार आहे. संजय सिंग यांच्या नेतृत्वात ही एसआयटी तपास करणार आहे. आज दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर संजय सिंग यांनी एनसीबी कार्यालयात येऊन तब्बल दोन तास सर्व बाबींचा आढावा घेतला. तसेच सहा केस संदर्भात असलेले सर्व डॉक्युमेंट एसआयटीने आपल्या ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -प्रभाकर साईल यांच्या वकिलाची एनसीबी अधिकाऱ्यांशी भेट; बोलवल्यास साईल हजर राहणार असल्याचे सांगितले
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह इतर पाच प्रकरणांचा तपास एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. 1996 च्या बॅचचे आईपीएस अधिकारी आणि एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांच्याकडे आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास हा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली एसआयटीची टीम आज (शनिवार) मुंबईत दाखल झाली आहे.
- एसआयटीकडून प्रकरणाचा तपास सुरू - संजय सिंग