मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने मुंबईत 3.95 किलो इफेड्रिन ड्रग्ज ( NCB seizes 3.95 kg Drags ) जप्त केले. हे ड्रग्ज पुण्यातून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते. याबाबत पुढील तपास एनसीबीचे अधिकारी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत करोड रुपये असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
- ड्रग्ज समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी -
हे ड्रग्ज महिलांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवले होते असं सांगण्यात येत आहे. मात्र, एनसीबीच्या मुंबई युनिटने अंधेरी (पूर्व) येथे छापे टाकले आणि अंमली पदार्थ जप्त केले. एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार हे ड्रग्ज पुण्यातून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, किमान 3.950 किलो इफेड्रिन जप्त करण्यात आले आहे. मात्र हे ड्रग्ज समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी होती. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गोव्यातही मोठी कारवाई -
दोन दिवसांपूर्वीच मुंबई एनसीबीने गोव्यात मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि गोवा एनसीबीने काल संयुक्तपणे उत्तर गोव्यातील अर्पोरा याठिकाणी छापेमारी केली आहे. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांना अटक केली असून यांच्याकडून जवळपास 25 किलो गांजा आणि MDMA च्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या महिलांमध्ये एक महिला विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोघींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने दोघींनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबी संयुक्तपणे करत आहेत.
दोन महिला तस्करांना रंगेहाथ अटक -
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबीच्या टीमने संयुक्तपणे जुन्या गोवा आणि उत्तर गोव्यातील बनस्तारीम आणि पोंडा याठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत एनसीबीने दोन महिला तस्करांना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी महिलांकडून पोलिसांनी 25 किलो गांजासह MDMA च्या काही टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमधील एक महिला विदेशी आहे.
हेही वाचा -Ex IPS A A Khan Dies At 81 : एन्काऊंटर स्पेशलिस्ट माजी आयपीएस अधिकारी ए. ए. खान यांचं निधन