महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर चार कोटींचे हेरॉईन जप्त - चार कोटींचे हेरॉईन जप्त

मुंबई विमानतळ परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. एनसीबीने गेल्या काही महिन्यांपासून ड्रग तस्करांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.

file photo
फाईल फोटो

By

Published : Nov 4, 2021, 9:11 PM IST

Updated : Nov 5, 2021, 7:56 AM IST

मुंबई - विमानतळ परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. एनसीबीने गेल्या काही महिन्यांपासून ड्रग तस्करांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून 700 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. 4 कोटी रुपये याची किंमत आहे. याबाबत एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

हेही वाचा -प्रभाकर साईल यांच्या वकिलाची एनसीबी अधिकाऱ्यांशी भेट; बोलवल्यास साईल हजर राहणार असल्याचे सांगितले

  • 700 ग्रॅम हेरॉईन जप्त-

एनसीबी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. मंगळवारी एनसीबीने मुंबईतील विलेपार्ले येथे मोठी कारवाई करून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केले होते. आज पुन्हा एकदा एनसीबीने कार्गो कॉम्प्लेक्सच्या कॉन्फ्रेंस हॉलमध्ये हेरॉईन जप्त केले. वडोदरा येथे मिळणाऱ्या या पार्सलची चौकशी बुधवारी करण्यात आली. आज हे पार्सल चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. या ड्रग्ज कारवाईत आरोपी कृष्णा मुरारी प्रसादला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. गुजरात मधून आलेले हे ७०० ग्राम ड्रग एनसीबी पथकाने पकडले आणि कृष्ण मुरारी नावाच्या इसमाला अटक केली. आता हे ड्रग कोणासाठी आले होते आणि कुठून पाठवले होते याचा एनसीबी तपास करीत आहे. कृष्ण मुरारी याचे मुंबईतील काही ड्रग पेडलर्सबरोबर संबंध असावेत असा संशय एनसीबी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबी अॅक्शन मूडमध्ये आहे. मागील आठवड्यात एनसीबीने कारवाई करत करोडो रुपयांचे ड्रग जप्त केले होते. त्यानंतर आज एनसीबीने मुंबईतील विमानतळावर मोठी कारवाई करत 700 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे.

हेही वाचा -विलेपार्ले येथे एनसीबीकडून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, संशयित आरोपी फरार

Last Updated : Nov 5, 2021, 7:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details