मुंबई - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील तपासादरम्यान मोठे ड्रग सिंडिकेट उघडकीस आले. यानंतर गोव्यात अटक केलेल्या ड्रग्ज डीलरला ट्रांझिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग पेडलरला अटक केली. यासंबंधी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली.
ख्रिस कोस्टाला 17 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कस्टडी; आणखी ड्रग डिलर रडावर - sushant singh suicide case
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने गोव्यातून ड्रग पेडलरला अटक केली. आता ख्रिस कोस्टाला 17 सप्टेंबरपर्यंत एनसीबीची कस्टडी देण्यात आली आहे.
आज मुंबईतील नार्कोटिक्स कोर्टाने ख्रिस कोस्टाला 17 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये ठेवण्यात आले. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी ख्रिस कोस्टा नावाच्या ड्रग पेडलरची चौकशी केली जाईल, असे अधिकाऱयांनी सांगितले. एनसीबीचे उपसंचालक के.पी.एस. मल्होत्रा यांनी रविवारी कोस्टाला अटक केल्याची माहिती दिली. त्याला मुंबई न्यायालयात हजर केले जाईल, असे ते म्हणाले.
सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर ड्रग रॅकेट तपासणीत ही ताजी अटक आहे. उर्वरित अटक केलेल्या आरोपींना एनसीबी किंवा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.