मुंबई -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रथम क्रमांकाचा पंच असलेल्या प्रभाकर साईल याने पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या संदर्भात एनसीबीने व्हिजिलन्स कमिटीने साईल यांना चौकशीला बोलावले आहे. या टीमचे प्रमुख असलेले ज्ञानेश्वर सिंग हे मुंबईला पोहोचले असून, याबाबत प्रभाकर साईलचा जबाब सोमवारी नोंदवला आहे.
याआधी प्रभाकर साईलने एक व्हिडिओ प्रसारित करत वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची दिल्लीच्या एनसीबी टीमकडून चौकशी करण्यात येत आहे. प्रभाकरला काही दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. तो न आल्याने एनसीबीने मुंबई पोलिसांनाही पत्र लिहिलं होतं. आज (सोमवारी) प्रभाकरला चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.