मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाकडून गेल्या 2 दिवसात मुंबई ठाणे मधील वेगवेगळ्या ठिकाणी मारलेला छापेमारी करण्यात आली. दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या कारवाईत 5 अमलीपदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. यात दोन महिला अमली पदार्थ तस्करांचा समावेश आहे.
27 मार्च रोजी मुंबईतील माहिम परिसरातील माव चायनीज रेस्टॉरन्ट जवळ करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 105 ग्राम मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये दोन अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. या अटक आरोपींमध्ये एका महिला आरोपीचा समावेश आहे.
याबरोबरचं 27 मार्च रोजी ठाण्यातील एव्हरेस्ट वर्ल्ड बिल्डिंग या ठिकाणी केलेल्या कारवाई दरम्यान 8 ग्राम एमडीच्या गोळ्या हस्त करण्यात आल्या. यामध्ये 20 एलएसडी ब्लॉट्स सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. या संदर्भात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
28 मार्च रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील मिलेनियम हेरिटेज या इमारतीच्या फ्लॅट नंबर 1203 या ठिकाणी छापा मारला असता 57 ग्राम मेफेड्रोन अमली पदार्थांसह 2 अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका महिला अमली पदार्थ तस्कराचा समावेश आहे.
अमली पदार्थ तस्करीसाठी अल्पवयीन मुलींचा वापर-
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरात मारण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान अमली पदार्थांच्या तस्करी साठी लहान अल्पवयीन मुलींचा वापर केला जात असून याचे मोठे रॅकेट मुंबईत सतर्क असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.
एनसीबीची मुंबई-ठाण्यात छापेमारी; 2 महिला तस्करांसह 5 जणांना अटक - mumbai marathi news
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाकडून गेल्या 2 दिवसात मुंबई ठाणे मधील वेगवेगळ्या ठिकाणी मारलेला छापेमारी करण्यात आली. दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या कारवाईत 5 अमलीपदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबीची मुंबई-ठाण्यात छापेमारी; 2 महिला तस्करांसह 5 जणांना अटक