महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीकडून मुंबईतली वांद्रे परिसारात 3 ठिकाणी छापेमारी - NCB raids places in Bandra

मुंबईतील वांद्रे परिसरात एनसीबीकडून 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये एनसीबीने छापा टाकला आहे.

NCB raids at three places in Bandra
वांद्रे परिसरात एनसीबीकडून 3 ठिकाणी छापेमारी

By

Published : Oct 23, 2021, 4:17 PM IST

Updated : Oct 23, 2021, 7:04 PM IST

मुंबई -मुंबईतील वांद्रे परिसरात एनसीबीकडून 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये एनसीबीने छापा टाकला आहे. क्रुझ ड्रग प्रकरणानंतर एनसीबी चर्चेत आली आहे. या प्रकरणानंतर एनसीबीच्या पथकांकडून विविध ठिकाणी धाडी टाकल्याचे दिसून आले. आज मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये एनसीबीने छापा टाकला.

हॉटेलमध्ये जाताना पथक

हेही वाचा -राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

परवा रात्री उशिराही टाकला होता छापा

परवा रात्री उशिरा एनसीबीच्या टीमने 20 ते 22 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. हा मुलगा कोण आहे? याबाबत एनसीबीतर्फे कोणतीही माहिती देण्यात आली नसून सूत्रांनुसार, तो ड्रग पेडलर असल्याचे सांगितले जात आहे.

एमडी ड्र्ग्ज जप्त

एनसीबीच्या वांद्रे युनिटचे पथक अंधेरीच्या चार बंगला परिसरात गस्त घालत असताना जम्बो किड्सच्या बाजूला एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना नजरेस पडली. तिला ताब्यात घेतले असता तिच्याजवळ 100 ग्राम एमडी मिळाले. चौकशीवेळी व्यक्तीने एमडी वर्सोवा येथे राहणारा अल्ताफ शेख याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शेखच्या घरावर धडक दिली. त्याच्याकडे 60 ग्राम एमडीचा साठा सापडला. पोलिसांनी अब्दुल्लाह शेख आणि अल्ताफ शेख या दोघांकडून 160 ग्राम एमडीचा साठा हस्तगत केला आहे.

क्रुज ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एनसीबीने गेल्या 2 दिवसांत मुंबईतील 6 ठिकाणी छापे टाकले. त्यापैकी अनन्या पांडेच्या घराचा समावेश आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेची गुरुवारी एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली, तसेच तीला शुक्रवारी सकाळी 11 वाजता एनसीबीने पुन्हा बोलावले.

ड्रग्ज प्रकरण इतर बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत -

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि अनन्या पांडे यांचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याचा एनसीबी प्रयत्न करत आहे. त्याच शोधात, वांद्रे येथील आंद्रीव रोड येथे अनन्या पांडेचे घर देखील आहे. क्रुज ड्रग्स प्रकरणात अनन्या पांडेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आर्यन खानचे ड्रग प्रकरण आता इतर बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अनन्या पांडेच्या घराची झडती घेतली आणि तिचा लॅपटॉप मोबाईल जप्त केला. ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यनच्या ड्रग्स चॅटमध्ये बातमी आली ती अनन्या पांडे असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वसुलीसाठी मंत्रालयात आरएसएसचे लोक?

Last Updated : Oct 23, 2021, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details