मुंबई-नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मुंबईत कारवाई करण्यात आली. मुंबईतील कुर्ला , लोखंडवाला , वर्सोवा डोंबिवली व वाशी परिसरामधील काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या दरम्यान 4 अमलीपदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 100 ग्राम एमडी जप्त करण्यात आलेले आहे.
मुंबईत एनसीबीची छापेमारी, 4 अमलीपदार्थ तस्करांना अटक - mumbai breaking news
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मुंबईत कारवाई करण्यात आली. मुंबईतील कुर्ला, लोखंडवाला, वर्सोवा डोंबिवली व वाशी परिसरामधील काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
मुंबईत एनसीबीची छापेमारी
या कारवाईदरम्यान एनसीबी कडून अन्वर शेख उर्फ करीम लाला, या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. मुंबईमध्ये या अमली पदार्थाच्या तस्करांचे 50 ते 60 जणांचे नेटवर्क सध्या काम करत आहे. त्यामुळे एनसीबीकडून कारवाई केली जात आहे.
हेही वाचा-पाकिस्तानकडून राजौरी सेक्टमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन