मुंबई - क्रूज ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा कारवाई सुरू केली. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप चाटच्या आधारे एनसीबीने आज अभिनेत्री अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. तब्बल अडीच तासा चौकशी करण्यात आली. अनन्या दोन तास उशिरा आल्यामुळे आज पूर्ण चौकशी करता आली नाही. त्यामुळे, अनन्याला उद्या पुन्हा 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीकरिता यायला सांगितले आहे.
एनसीबीकडून कागदोपत्री चौकशी करण्यात आली. एनसीबीकडे असलेले पुरावे हे अनन्या पांडेला दाखवण्यात आले. अनन्या पांडेचा मोबाईल एनसीबीने ताब्यात घेतला असून या संदर्भात काही माहिती मिळते का, हे शोधण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा -सुखद लोकल प्रवास : डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घराचीही झडती घेतली. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. एनसीबीने अनन्या पांडेला (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून अनन्या पांडेच्या घराची झडती घेण्यात येत आहे. तसेच, अनन्या पांडेला आज एनसीबीने चौकशीकरिता कार्यालयामध्ये बोलवले. त्यानंतर एनसीबीची टीम शाहरूख खानच्या मन्नत या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनचे व्हाँट्सअप चॅट