महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NCB Adv Advait Sethna Resigns कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खान विरोधात सरकारी वकील अद्वैत सेठना यांचा राजीनामा - NCB Public Prosecutor Adv Advait Sethna Resigns

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान Actor Shah Rukh Khan Son Aryan Khan याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात Cordelia Cruz Drug Party Case अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आर्यन खानविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे NCB विशेष सरकारी वकील असलेले अद्वैत सेठना यांनी राजीनामा दिला आहे. अद्वैत सेठना यांचा राजीनामा एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात NCB Special Prosecutor Adv Advait Sethna Resigns आला आहे.

NCB Adv Advait Sethna Resigns
आर्यन खान विरोधात सरकारी वकील असलेले अ‍ॅड. अद्वैत सेठना यांचा राजीनामा

By

Published : Aug 25, 2022, 8:10 AM IST

Updated : Aug 25, 2022, 11:03 AM IST

मुंबईबॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला Actor Shah Rukh Khan Son Aryan Khan कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात Cordelia Cruz Drug Party Case अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान विरोधात मुंबई सत्र न्यायालयात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे NCB विशेष सरकारी वकील असलेले अ‍ॅड. अद्वैत सेठना यांनी राजीनामा NCB Special Prosecutor Adv Advait Sethna Resigns दिला आहे. एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातएनसीबीकडून क्लीन चीट देण्यात आली होती.


राजीनामा मंजूर होईपर्यंत या केसवर काम अद्वैत सेठना यांचा राजीनामा एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार एनसीबीचे महानिदेशक राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेतील. अद्वैत सेठना यांनी विशेष कोर्टाला सांगितलं की आरोग्य चांगलं राहत नसल्यानं ते एनसीबीच्या वकिलीचा ते राजीनामा देत आहेत. एनसीबी पुढील कारवाईसाठी निर्णय घेईल. परंतु राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना या प्रकरणी काम पाहावे लागेल.


एनसीबीकडून 2020 मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती आर्यन खानच्या अद्वैत सेठना यांना एनसीबीने 2020 विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली होती. क्रूज शिप ड्रग्सप्रकरणी ते मुख्य सरकारी वकील आहेत. आर्यन खानविरोधात ऑक्टोबरमध्ये तक्रार करण्यात आली होती. आर्यनला नंतर एनसीबीने विशेष तपास पथकाने क्लीन चीट दिली. आरोपींकडून जामिनाच्या याचिकेवर निर्णय घेण्यात आला नव्हता. 3 ऑक्टोबरला आर्यनच्या पहिल्या कोठडीदरम्यान एनसीबीकडून वकील म्हणून अद्वैत सेठना काम पाहत आहेत. एनसीबीने एकूण 20 जणांना अटक केली होती. एसआयटीने मे महिन्यात आर्यन खानला क्लीनचीट दिली होती. मादक पदार्थ सापडल्याने दोन आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत.



ड्रग्स प्रकरणात आर्यनसह सहा आरोपींवरील आरोपींना सोडले या प्रकरणातील आरोप पत्र 27 मे रोजी सादर केलेल्या त्यावेळी एनसीबीने आर्यनसह सहा आरोपींवरील आरोप वगळले. पुरेशा पुराव्याअभावी त्यांना सोडून दिले होते. आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि क्रूझ पाहुणे मुनमुन धमेचा यांना 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते. त्यांना महिन्याच्या अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आर्यनवर कुठलेही औषध सापडले नाही. मर्चंट आणि धामेचा यांचा आरोपपत्रात समावेश आहे. एफआयआरमध्ये 20 आरोपींची नावे आहेत. कथित अमली पदार्थ तस्कर अब्दुल कादर आणि नायजेरियन नागरिक चिनेदू इग्वे हे दोनच आरोपी तुरुंगात आहेत.



नेमकं प्रकरण कायमुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहाव लागलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खान ची जामीन फेटाळून लावली होती मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खान ने जामीन अर्ज दाखल केला होता त्यानंतर तीन दिवस कंटिन्यू सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाली होती.







हेही वाचा Maharashtra Monsoon Session आमदार एकमेकांवर धावले धक्काबुक्कीही केली मिटकरींचा शिवीगाळीचा आरोप

Last Updated : Aug 25, 2022, 11:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details