मुंबई -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रथम क्रमांकाचा पंच असलेल्या प्रभाकर साईल याने पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या संदर्भात एनसीबीने व्हिजिलन्स कमिटीने साईल यांना चौकशीला बोलावले होते. सोमवारी साईल चौकशी हजर झाल्यानंतर एनसीबीकडून साईलची सुमारे सात तास चौकशी करण्यात आली. यावेळी आमच्याकडे असलेले पुरावे हे आम्ही त्यांना दिलेले आहेत अशी माहिती प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारे यांनी दिले आहे.
प्रभाकर साईलची 7 तास चौकशी -
एनसीबीच्या एसआयटी टीमचे प्रमुख असलेले ज्ञानेश्वर सिंग यांनी प्रभाकर साईलचा जबाब सोमवारी नोंदवला. एनसीबीचे अधिकारी सुमारे सात तास प्रभाकर साईल याची चौकशी करत होते. प्रभाकर साईल आपल्या वकिलांच्या टीमसह चौकशीसाठी वांद्रे भागातील सीआरपीएफ कॅम्प ऑफिसमध्ये दाखल झाला होता.