नवी मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची नवी दिल्लीतील एनसीबीच्या विशेष पथकाने सुमारे सात तास कसून चौकशी केली. सात तासांच्या चौकशीनंतर रात्री एक वाजेच्या सुमारास आर्यनला एनसीबीकडून सोडण्यात आले. दरम्यान, आर्यन खानचा आज 24 वा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता एनसीबीकडून आर्यनच्या चौकशीला सुरूवात झाली. नवी मुंबईतील RAF एनसीबी कार्यालयात आर्यनला जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले होते. तेव्हापासून ते रात्री एक वाजेपर्यंत एनसीबीच्या विशेष पथकाने आर्यनची चौकशी केली. क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यनची चौकशी करण्यात आली.
दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी -
क्रुझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांनी एनसीबी कार्यालयात आज (शुक्रवारी) हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.