महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ananya Panday : अनन्या पांडेची NCB कडून चार तास चौकशी; सोमवारी पुन्हा बोलावले - Ananya Panday ncb questioning on monday

सोमवारी पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे समन्स एनसीबीने अनन्या पांडेला बजावले आहे. अनन्याची एनसीबीकडून आजची(22 ऑक्टोबर) चौकशी संपली आहे. अनन्या चौकशीसाठी आज दुसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात हजर राहिली होती.

Ananya Panday
अनन्या पांडे

By

Published : Oct 22, 2021, 8:06 PM IST

Updated : Oct 22, 2021, 8:30 PM IST

मुंबई - अनन्या पांडेची एनसीबीकडून आजची(22 ऑक्टोबर) चौकशी संपली आहे. अनन्या पांडे चौकशीसाठी आज दुसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात हजर राहिली होती. वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात अनन्यासोबत हजर होते. तसेच सोमवारी पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे समन्स एनसीबीने अनन्या पांडेला बजावले आहे.

अशोक जैन - डीजी, एनसीबी
  • अनन्या पांडेची आज चार तास झाली चौकशी-

ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबत अनन्याचेही नाव आल्याची माहिती काही चॅटमुळे समोर आले आहे. यामुळे एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावले होते. सोमवारी पुन्हा अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती NCB DG अशोक जैन यांनी दिली.

हेही वाचा -एजाज खानच्या पत्नीची एनसीबीकडून चौकशी

  • अनन्याची सोमवारी पुन्हा चौकशी होणार -

ड्रग, छापेमारी, चौकशी, एनसीबी, आरोप-प्रत्यारोप या सर्व गोष्टींमुळे बॉलिवूड सध्या चर्चेत आल आहे. ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या तुरुंगात आहे. आता त्या पाठोपाठ चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असताना आता २१ वर्षीय अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे.

अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाबाहेर
  • एनसीची अधिकारी गुरुवारी 'मन्नत' आणि अनन्याच्या घरी पोहचले होते -

गुरुवारी(21 ऑक्टोबर) एनसीबी अधिकारी अनन्या पांडेच्या घरी पोहचले होते. तसेच शाहरूख खानच्या मन्नत या बंगल्यावरही एनसीबी अधिकारी गेले होते. अनन्या पांडे ही आर्यन खानची मैत्रीण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. क्रूझ ड्रग्स पार्टी केसमध्ये आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती आहे. या चॅटमध्ये नशेबाबत बोलणे झाले होते. ही अभिनेत्री म्हणजे, अनन्या पांडे असल्याचे समजते. त्यामुळे आता अनन्या पांडेची चौकशी सध्या एनसीबीकडून सुरू आहे. पुढील काळात तिच्या चौकशीतून काही निष्पन्न होते, तसेच या ड्रग पार्टी प्रकरणाचा लिंक अजून कोणापर्यंत पोहोचतात हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

हेही वाचा -Ananya Panday : अनन्या पांडेची NCB कडून तब्बल साडेतीन तास चौकशी

  • एनसीबीच्या चौकशीत अनन्याला काय विचारण्यात आलं?

काल समीर वानखेडे यांनी स्वत: अनन्याची चौकशी केली. यावेळी एक महिला अधिकारी देखील होत्या. त्यांनी अनन्याला तिच्या आर्यन सोबतच्या मैत्रीबाबत विचारलं. तसेच तिला ड्रग्स पेडलरबाबत विचारलं. तिच्यात आणि आर्यन यांच्यात झालेले संवाद तिला दाखवण्यात आले. त्या चॅटबाबत तिला विचारण्यात आलं.

  • नेमकं प्रकरण काय?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी क्रूझवर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे whats app चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या दोघांमधील चॅट एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केले होते.

Last Updated : Oct 22, 2021, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details