मुंबई- अमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडून अटक करण्यात आलेला कैझेन इब्राहिम याला 10 हजार रुपये भरण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाला. मात्र, त्याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सत्र न्यायालयात केली आहे.
एनसीबीने अटक करण्यात आलेल्या जैद विलात्रा, सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती, दिपेश सावंत, अब्दुल बासिथ परिहार यांच्यासह रिया चक्रवर्ती यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी कैझेन इब्राहिमचाही जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.
हेही वाचा-रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला
अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा संबंध हा थेट कैझेन इब्राहीम याच्यासोबत आहे. सर्व आरोपींनी अमलीपदार्थ पुरविण्यासाठी कैझेन याच्याशी सर्व आरोपींनी संपर्क साधला होता, असे एनसीबीने सत्र न्यायालयात सांगितले. कैझेन इब्राहीम याला एनसीबीकडून अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जामीन अर्ज मंजूर केला होता.
हेही वाचा-'बजाज फायनान्स'ला मनसेचा दणका, १ लाख १९ हजार ७४३ रिक्षामालकांना आर्थिक दिलासा
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास करत असताना अमलीपदार्थाचा अभिनेत्याच्या घरी पुरवठा करण्यात आल्याचे समोर आले. एनसीबीकडून अमलीपदार्थाच्या पुरवठ्याबाबत तपास करण्यात येत आहे.