मुंबई -आर्यन खानसह तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जामिन दिल्यानंतर एनसीबीकडून प्रथमच प्रतिक्रिया आली आहे. न्यायालयाने आर्यन खानला जामीन दिला असला तरी क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आमची चौकशी सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल याने एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करुन वानखेडे यांच्यावर 25 कोटीच्या लाचखोरीचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती. यानंतर समीर वानखडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीने पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीचे सदस्य बुधवारी मुंबईत दाखल झाले आहेत.
संबंधित बातमी वाचा-'एनसीबी'चा वादग्रस्त पंच किरण गोसावीचा फरार असताना जळगावात मुक्काम?
आम्ही लवकरच निष्कर्ष लावू-
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, या ड्रग्स पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केले. त्याबाबत आरोपाची चौकशी सुरू आहे. प्रभाकर साहिलच्या चौकशीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी चौकशी साठी सहभागी व्हावे याकरीता मीडियाच्या माध्यमातून के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. कारण त्यांची चौकशी केल्याशिवाय कोणत्याही ठोस निर्णयापर्यत पोहचता येणार नाही. या प्रकरणातील मुख्य पंच के. पी. गोसावी सध्या कस्टडीमध्ये आहे. आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत की, आम्हाला चौकशीसाठी के. पी. गोसावीला ताब्यात द्या. आम्हाला अपेक्षा आहे की, न्यायालय आमचे ऐकणार आहे. लवकरच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहचू अशी आशासुद्धा एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी व्यक्त केली आहे.