मुंबई - अमली पदार्थ तस्करी प्रकर्णी अटक करण्यात आलेल्या ब्रिटिश अनिवासी भारतीय कारण सजनानी आणि अभिनेत्री दिया मिर्झा हीचि माझी मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या फर्निचरवाला या दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने 16 जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी वाढवण्यात आली आहे.
करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्या एनसीबी कोठडीत वाढ - news about NCB custody
अमली पदार्थ तस्करी प्रकर्णी अटक करण्यात आलेल्या करण साजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्या एनसीबी कोठडीत वाढ झाली आहे. त्यांची 16 जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी वाढवण्यात आली आहे.

करण सजनानी व समीर खान यांच्या संबंध असल्याचा एनसीबिचा दावा -
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला सुद्धा अटक करण्यात आली होती. समीर खानची रवानगी 18 जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आलेली आहे. न्यायालयात आज एनसीबी कडून पक्ष ठेवला जात असताना अमली पदार्थ तस्कर करण सजनानी व समीर खान या दोघांमध्ये घडलेले व्हाट्सअप चॅट बरोबरच अमली पदार्थांच्या संदर्भातील मागणी व गांजाचे काही फोटो न्यायालयात सादर करण्यात आले होते. अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात करण सजनानी व समीर खान या दोघांमध्ये संपर्क सुरू होता. यामध्ये काही आर्थिक व्यवहार ही बँकेच्या माध्यमातून झाले असल्याचे त्याला सांगण्यात आले आहे . या प्रकरणात काही साक्षीदार असून आणखीन बऱ्याच गोष्टींचा तपास करणे बाकी असल्यामुळे समीर खानची कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार सर्व आरोपींना एनसीबीकोठडीत पाठवण्यात आले आहे.