महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीने सुशांतच्या दोन नोकरांना चौकशीसाठी बोलाविले

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला नुकतीच हैदराबादेतून अटक केली. त्यानंतर आता एनसीबीने याप्रकरणी सुशांतकडे काम करणाऱ्या दोन नोकरांना देखील चौकशीसाठी बोलावले आहे. नीरज आणि केशव अशी या दोघांची नावं असून ते आठ महिन्यांपासून मुंबईच्या बाहेर होते.

सुशांतसिंह राजपूत
सुशांतसिंह राजपूत

By

Published : May 30, 2021, 5:37 PM IST

मुंबई -सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला नुकतीच हैदराबादेतून अटक केली. त्यानंतर आता एनसीबीने याप्रकरणी सुशांतकडे काम करणाऱ्या दोन नोकरांना देखील चौकशीसाठी बोलावले आहे. नीरज आणि केशव अशी या दोघांची नावं असून ते आठ महिन्यांपासून मुंबईच्या बाहेर होते.

सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणात यापूर्वीच चौकशी-

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने जून 2020 मध्ये मुंबईतील बांद्रा स्थित घरामध्ये आत्महत्या केली होती. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत त्या वेळेस त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी हा घरामध्ये उपस्थित असल्यामुळे त्याची वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून चौकशी केली जात असताना काही व्हाट्सअप चॅट हे अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात ईडीला मिळाले होते. त्यानंतर सदरचे व्हाट्सअप चॅट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आलेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली होती.

सुशांतसिंह राजपूत यास अमली पदार्थांचा पुरवठा करण्याच्या कामात सिद्धार्थ पिठाणी याचा मुख्य सहभाग असल्याचा त्यावेळेस एनसीबीच्या तपासात समोर आले होते. सिद्धार्थ पिठाणी हा हैदराबादमध्ये असल्याचा कळल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथे जाऊन त्यास अटक केली. त्यानंतर त्याची ट्रांजिस्ट रिमांड घेऊन मुंबईत आणण्यात आले असून सध्या पोलीस कोठडीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details