मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मुंबईतील वर्सोवा परिसरातून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात एका टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीलासुद्धा अटक करण्यात आली आहे. प्रितिका चौहान असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे.
एनसीबीने टीव्ही सिरीयल अभिनेत्रीला केली अटक हेही वाचा -देशातील सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस; भाजप नेत्याचा दावा
सहा जणांना एनसीबीकडून अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टांझानियाच्या एका नागरिकाचाही समावेश आहे. नार्कोटिक्स कंट्रोलला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली होती. वर्सोवा परिसरातील मच्छीमार कॉलनी या ठिकाणी धाड मारून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
प्रितिका चौहान असे अटक केलेल्या टीव्ही अभिनेत्रीचे नाव -
एनसीबी अधिकाऱ्यांनी 99 ग्राम गांजा या कारवाईदरम्यान हस्तगत केला आहे. अमली पदार्थ पुरवणाऱ्या फैसल (20) याबरोबरच ते विकत घेणाऱ्या प्रितिका चौहान या दोघांना न्यायालयात हजर केले होते. यानंतर त्यांची रवानगी एनसीबी कोठडीत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली अभिनेत्री प्रितिका चौहान ही वेगवेगळ्या टीव्ही सिरीयलमध्ये काम काम करत आहे.