विदेशी ड्रग्ज तस्करांवर छापा टाकताना NCB चे 4 अधिकारी जखमी, एकाची प्रकृती गंभीर - विदेशी ड्रग्स तस्करांना अटक
चार ते पाच परदेशी नागरिक ड्रग्सचा व्यवसाय करत होते. रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत त्यांचा धंदा चालायचा. त्यानुसार वानखडे यांनी आपल्या पथकासह काल (गुरूवारी) संध्याकाळी धाड टाकली. यावेळी हत्यारबंद ड्रग्स तस्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत हे गंबीर जखमी झाले आहे.
ड्रग्स तस्कर
मुंबई -ड्रग्स तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या पथकावर हल्ल्याची घटना घडली आहे. परदेशी नागरिक असलेल्या ड्रग्स विकणाऱ्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे 4 अधिकारी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली आहे.
Last Updated : Aug 13, 2021, 5:12 PM IST