मुंबई- अमली पदार्थ तस्करी संदर्भात तपास करत असलेल्या मादक पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) करण्यात आलेल्या एका कारवाईदरम्यान मुंबईतील माहीम परिसरामधून 136 ग्रॅम 'एमडी' हे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले असून यासंदर्भात माहीम रेल्वे स्थानकातून 2 अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी मादक पदार्थ नियंत्रण विभागाने मोहम्मद बिलाल व शेख गुलाम घोष या दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली. या दोघांना अटक करण्याअगोदर एनसीबीकडून सेहबाज शाह आलम शेख यास ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून मोहम्मद बिलाल शेख, शेख गुलाम घोष या दोन आरोपींना अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक करण्यात आली आहे.