मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी (Minority Minister Nawab Malik Tweet) आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचे ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ते आपल्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड (Central Investigation Agency Raid) पडणार असल्याची शंका व्यक्त करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Government) नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा आरोप सातत्याने आघाडी सरकारचे नेते तसेच मंत्र्यांकडून केला जातोय. त्यामुळे नवाब मलिक यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Nawab Malik Tweet : गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, नवाब मलिकांचं नवीन ट्वीट
सातत्याने ट्विट करत, पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात वक्तव्य करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक (Minority Minister Nawab Malik Tweet) यांनी पुन्हा एकदा सूचक असे ट्विट केले आहे. माझ्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार आहेत असं ते म्हणाले आहेत. मलिक यांचा इशारा हा केंद्रीय तपास यंत्रणांकडे (Central Investigation Agency Raid) असल्याचे यातून दिसून येतेय.
लढा सुरूच ठेवणार
गेल्या काही दिवसापासून नवाब मलिक हे सातत्याने अमली पदार्थ विरोधी पथक (NCB) आणि केंद्रीय तपास यंत्रणा तसेच केंद्र सरकारवर (Central Government) टीकेची झोड उठवत आहे. खास करून एनसीबीकडून (Fake Case By NCB) कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल केल्या जातात, हे सातत्याने आपल्या ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते सांगत आहेत. एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे (Zonal DCP Sameer Wankhede) यांची कार्यपद्धती तसेच त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सातत्याने नवाब मलिक आरोप करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा तसेच केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांमुळे आपल्या घरावर किंवा नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडू शकते, अशी शक्यता वेळोवेळी त्यांनी वर्तवली आहे. त्याच अनुषंगाने नवाब मलिक यांनी ट्विट करून आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचं म्हटल आहे. मात्र सरकारी पाहुणे जरी आपल्या घरी आले तरी, आपण घाबरणार नाही. आपला लढा सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी आपल्या ट्विट मधून दिला आहे.