महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मी दुबई ला चाललोय, सरकारी यंत्रणेने माझ्यावर लक्ष ठेवावे!'

नवाब मलिक यांनी दुबईला जाण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत. तरी सरकारी यंत्रणेने आपल्या हालचालींवर लक्ष ठेवावे. आपण 24 नोव्हेंबरला परत मुंबईत येणार आहोत. अशा आशयाचे ट्विट नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आले.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Nov 20, 2021, 6:53 AM IST

मुंबई - रोज एक नवीन ट्विट करून नवीन खुलासा करण्याचा दावा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Tweet Nawab Malik) करताना दिसतात. कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणामध्ये (Cardelia Cruise Drugs Case) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखडे (Sameer Wankhade) यांच्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच शासकीय नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी आपला धर्म लपवल्याचा आरोपही नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने करण्यात येतो. याबाबत रोज ट्विटर किंवा पत्रकार परिषदेत नवाब (Nawab Malik press conference) आरोप करताना दिसतात.

मात्र आज त्यांनी ट्विट करून आपण दुबईला (Dubai expo) जाणार असल्याचे सांगितले आहे. दुबईला जाण्यासाठी आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत. तरी सरकारी यंत्रणेने आपल्या हालचालींवर लक्ष ठेवावे. आपण 24 नोव्हेंबरला परत मुंबईत येणार आहोत. अशा आशयाचे ट्विट नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आले. त्यामुळे दुबईवरून आल्यानंतर नवाब मलिक पुन्हा एकदा कोणता नवा खुलासा करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अल्पवयीन समीर वनखडेंना बार चालवण्याचे परमिट कसे?

समीर वानखेडेचे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागात (State excise duty) काम करत असताना फर्जीवाडा करुन एक लायसन्स समीर वानखेडे याच्या नावावर सन १९९७-९८ मध्ये घेतले. हे परमिट सन १९९७ पासून समीर वानखेडे याच्या नावावर नुतनीकरण होत राहिले आहे. ते आता २०२२ पर्यंत ३ लाख १७ हजार ६५० रुपये भरून नुतनीकरण करण्यात आलेले आहे. समीर वानखेडे याचे वय त्यावेळी १७ वर्षे १० महिने १९ दिवस होते. तरीही त्याच्या वडिलाने लायसन्स मिळवले. मुळात १८ वर्षाखालील कुणालाही लायसन्स दिले जात नाही. असे असताना ९७ पासून आजपर्यंत सद्गुरु रेस्टॉरंट आणि बार (Sadhguru Restaurant and Bar) हा व्यवसाय सुरू आहे.

२०१७ मध्ये समीर वानखेडे याने आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यात त्याने याचा उल्लेख करताना त्याची १९९५ मध्ये एक कोटी किंमत दाखवली आहे. शिवाय वडील आणि आई यांची नावेही आहेत. ही आईकडून संपत्ती मिळाली आणि वर्षाला २ लाख रुपये भाडे मिळते असे नमूद केले आहे. २०२० मध्येही तीच किंमत आणि तितकेच भाडे मिळत असल्याचे नमूद केले आहे. हाच फर्जीवाडा असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून नवाब मलिक यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details