मुंबई - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवीन ट्विट केले आहे. एका हॉटेलचा फोटो ट्विट करून समीर वानखडेंचा अजून एक फर्जीवाड्याचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केला.
समीर वानखेडेंचा आणखी एक फर्जीवाडा; मलिकांचे नवे ट्विट
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवीन ट्विट केले आहे. एका हॉटेलचा फोटो ट्विट करून समीर वानखडेंचा अजून एक फर्जीवाड्याचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केला.
नवाब मलिक म्हणाले, शाळेचे रेकॉर्ड बदलले गले. 1995 ला खोटे कागदपत्र आणली गेली आणि शेड्यूल कास्टचे सर्टीफीकेट घेतले. त्यानंतर जातीच्या आधाराचार इतर सुविधा आणि IRS ची नोकरी मिळवली. जात पडताळणी समोर कागदपत्र ठेवणार आहे. समीर वानखडे यांच्या वडिलांनी 1997 ला 875 हॉटेल सद्गृहस्थ नावाने बारचे परमिट देण्यात आले. ते समीर ज्ञानदेव वानखडे यांच्या नावाने आहे. 2022 मध्ये शेवटचे नुतनीकरण करण्यात आले. परमिट देतेवेळी 17 वर्ष 10 महिने एवढं वय समीर यांचे होते. मात्र 18 वर्ष पूर्ण झाल्या शिवाय परमिट देता येते नाही. 2017 मध्ये समीर वानखडे यांनी आपली संपत्ती जाहीर केली. नवी मुंबईतही हॉटेलमध्ये त्यात उल्लेख आहे. अल्पवयीन असताना परमिट कसे मिळाले. नोकरी मिळाल्यावर त्यांनी खोटी माहिती दिली. त्यामुळे वानखडे यांना नोकरीत राहण्याचा अधिकार नसल्याचे मलिक म्हणाले.