महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik Tweet : नवाब मलिकांनी ट्विट केला मांजराचा चेहरा आणि कोंबड्याचं शरीर असलेला फोटो.. म्हणाले पैहचान कौन? - घरकोंबडा

दररोज वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करणाऱ्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आजही ट्विट ( Nawab Malik Tweet ) करून ट्विटरवर नेटिझन्सना एकप्रकारे खाद्यच दिले आहे. मलिक यांनी कोंबड्याचं शरीर आणि मांजराचे तोंड असलेला फोटो ट्विट केला आहे. त्यावर पैहचान कौन? असं कॅप्शनही टाकलं आहे. विधानसभेच्या बाहेर झालेल्या म्याऊ- म्याऊ प्रकरणानंतर ( Nitesh Rane Teased Aaditya Thackeray ) मालिकांनी केलेल्या या ट्विटचा रोख नेमका कुणाकडे आहे? याबाबत ट्विटरवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येत आहेत.

नवाब मलिकांनी ट्विट केला मांजराचा चेहरा आणि कोंबड्याचं शरीर असलेला फोटो..
नवाब मलिकांनी ट्विट केला मांजराचा चेहरा आणि कोंबड्याचं शरीर असलेला फोटो..

By

Published : Dec 24, 2021, 6:26 PM IST

मुंबई : नवाब मलिक यांनी आज कोंबडा आणि कोंबड्याला मांजराचे तोंड असलेला फोटो ट्विट ( Nawab Malik Tweet ) केला आहे. ट्विट केल्यावर क्षणातच त्यावर नेटिझन्सच्या तुफान प्रतिक्रिया ( Netizens Reactions Nawab Malik Tweet ) येत आहेत. या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोवर ‘पेहचान कौन?’ असा प्रश्न देखील लिहिला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करताच नेटिझन्सनेही त्यावर प्रतिक्रिया देत आपापले अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

मालिकांचा रोख राणेंकडे?

गुरुवारी विधानसभेचे कामकाज ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) सकाळी 11 वाजता कामकाज सुरु होण्याअगोदर विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून भाजपा आमदार सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. त्याच दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे विधान भवनात आले असता, विरोधकांनी म्याऊ- म्याऊ- म्याऊ- म्याऊ अशा घोषणा देत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आमदार नितेश यांनी हा शब्द अगोदर उच्चारला व त्याला इतर आमदारांनी साथ दिली ( Nitesh Rane Teased Aaditya Thackeray ) . यावेळी भाजपाचे नेते हसताना पाहायला मिळाले. त्यानंतर आता मलिक यांनी कोंबडा आणि मांजर असलेला फोटो ट्विट केल्याने त्यांचा रोख हा राणेंकडे तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.

नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान, नवाब मलिक यांनी ट्विट केल्यानंतर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया त्यावर आल्या आहेत. त्यामध्ये 'कोंबडीचोर', 'छोटा चिकन', 'कोंबमनी', 'घरकोंबडा', 'आंब्याच्या झाडावर बसलाय मोर... म्यॅव म्यॅव करतोय कोंबडी चोर..!', अशा अनेक प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - आदित्य ठाकरे येताच विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसलेल्या नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details