मुंबई -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर आर्थिक फसवणूक प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल ( ED Filed Case ) करण्यात आल्यानंतर 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांचा मुक्काम ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. शुक्रवारी मध्यरात्री अनिल देशमुख हे बाथरूमला गेले असता तिथे पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. देशमुख बाथरूममध्ये पडल्याची माहिती नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना माहिती कळताच त्यांनी तत्काळ देशमुखांकडे धाव घेतली. त्यांच्या खांद्यावर प्राथमिक उपचार केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वैद्यकीय चाचणी होणार :जे जे हॉस्पिटलचे अधीक्षक यांच्या माहितीनुसार अनिल देशमुख यांना शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार देखील सुरू करण्यात आले आहे. आज अनिल देशमुख यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्यात स्पष्ट होणार आहे, की अनिल देशमुख यांची दुखापत कितपत आहे आणि किती वेळ यावर उपचार केल्यानंतर बरी होईल, अशी माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.