महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik on Nagar Panchayat Election : 'नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचं अव्वल, 80 टक्के भाजप विरोधी मतदान' - मलिकांची भाजपवर टीका

नगर पंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Sarkar) मोठ्या प्रमाणात सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. निवडणूक आयोगात याबाबत तक्रार का केली नाही ? भारतीय जनता पक्षाचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का ? असा प्रतिप्रश्न नवाब मलिक (Nawab Malik Questions BJP) यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना केला आहे.

Nawab malik
Nawab malik

By

Published : Jan 20, 2022, 2:06 PM IST

मुंबई - नगरपंचायत निवडणुकांचे (Nagar Panchayat Election) काल निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानंतर असे सिद्ध झाला आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नगर पंचायत निवडणुकांमध्ये अव्वल ठरला. हाती आलेल्या जागांचा निकालांपैकी 75 टक्के जागा या महाविकासआघाडी मधील पक्षाने जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अव्वल पक्ष ठरला असून 27 जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच अजून दहा ठिकाणी सहयोगी पक्षांना बरोबर घेऊ सत्ता स्थापन करू असा विश्वास अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik on Nagar panchayat Election) यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांमध्ये त्रुटी असल्याकारणाने लवकरच त्यामध्ये फेरबदल करण्यात येतील. आणि योग्य निकाल लवकर समोर येईल. त्या निकालानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा नगर पंचायत निवडणुकांमध्ये नंबर एकचा पक्ष असणार असल्याचे नवाब मलिक यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात 80% नागरिकांनी मतदान केलं असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही ?

नगर पंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येतोय. मात्र, अशी काही घटना भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आली असेल. तर, त्यांनी निवडणूक आयोगात याबाबत तक्रार का केली नाही ? भारतीय जनता पक्षाचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का ? असा प्रतिप्रश्न नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना केला आहे.

पंजाबमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेच्या गैरवापर
पंजाबच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना, तिथे भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री यांच्या जवळच्या नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये निवडणुका असताना राज्यांमधील विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून अशा धाडी घातल्या जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा -Dhyandev Wankhede Against Nawab Malik : ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांच्या विरोधात पुन्हा मानहानीची याचिका

ABOUT THE AUTHOR

...view details