मुंबई -राज्यासह मुंबईत कोरोनाचा फैलाव ( Coronavirus Omicron variant ) वाढतो आहे. लोकांकडून नियमावलीचे पालन केले जात नाही. त्रिसूत्रीचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन पर्याय निवडावा लागेल, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक ( Nawab Malik On Lockdown ) यांनी आज दिले. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले नवाब मलिक -
राज्यात आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. काल राज्यात ३ हजार ९०० रुग्ण नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईत काल २ हजार ५१० रुग्ण आढळून आले. दुसरीकडे ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीवर मुंबई महापालिकेने कठोर निर्बंध लावले आहेत. मुंबईत आजपासून जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास सोसायट्या सील केल्या जाणार आहेत. राज्य सरकारदेखील वाढत्या रुग्ण संख्येबाबत सतर्क झाले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहेत. लोकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. रुग्ण संख्या फोफावत आहे. नागरिकांना कोरोना नियमावलीचे पालन करावे. त्रिसुत्रीचे पालन न केल्यास लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकार घ्यावा लागेल, असा इशारा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
मुंबई कलम 144 लागू -