महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजनाथ सिंह यांच्या टीकेला नवाब मलिकांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : Jun 9, 2020, 1:56 PM IST

मुंबई - लोकशाही मार्गाने चालणार्‍या सरकारला 'सर्कस' बोलणार्‍या राजनाथ सिंह यांचे ते 'अनुभवाचे बोल' आहेत, असा प्रतिटोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे सरकार हे सर्कस असल्याची सोमवारी टीका केली होती.



केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरू आहे. आयसीएम‌आरने मुंबई मॉडेलची चांगली स्तुती केली आहे. असे असताना केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह हे रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार, असे वक्तव्य करत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल असल्याची नवाब मलिक यांनी ट्विटरवरून टीका केली.

काय म्हणाले राजनाथ सिंह?

महाराष्ट्रातील कोरोनाच्या संकटावरून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. सध्याची राज्याची स्थिती ही चांगल्या कारभाराऐवजी सर्कशीसारखी आहे, अशी त्यांनी टीका केली होती. ते भाजप कार्यकर्त्यांच्या ऑनलाइन रॅलीमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे बळकट नेतृत्व असताना राज्यातील स्थिती दुर्देवी आहे. सरकारमधील आघाडीमध्ये सत्तेची हाव वाढत आहे, अशी त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेसाठी 16 तास वाट पाहावी लागते. तेव्हा, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? असे आश्चर्य वाटत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details