मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी 'गंगाने बुलाया है' असे म्हटले होते. मात्र, पंतप्रधान होऊन साडेसात वर्ष होऊन गेली. परंतु अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik slammed PM over Ganga cleanness ) यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी येथे केलेल्या कार्यक्रवर ( NCP slammed after PM programs in Kashi ) राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे ते निवडणूकीचे क्षेत्र आहे. केंद्रात मोदी सरकार येऊन साडेसात वर्षे झाली आहेत. मात्र, काशीच्याबाबतीतदेखील पंतप्रधानांनी दिलेले आश्वासने अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. पावसाळ्यात संपूर्ण काशीमध्ये गुडघाभर पाणी भरते, यावर अद्यापही उपाय योजना करण्यात आलेली नाही, यावरही नवाब मलिक यांनी बोट ठेवले. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंतप्रधानांना निवडणूक क्षेत्र आणि आजूबाजूच्या कमीत कमी चार ठिकाणी पराभव पत्करावा लागणार आहे. ज्याठिकाणी ते निवडणूक लढतात तिथे आणि आजूबाजूच्या ४ जागाही निवडून येणार नाहीत, असा टोला अल्पसंख्यांक मंत्री मलिक ( Nawab Malik takes jibe at PM ) यांनी लगावला आहे.
हेही वाचा-Soldier Shoots Self : कुपवारामध्ये जवानाची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या
सामूहिक नेतृत्वाखाली एकजूट होण्याची तयारी
केंद्रातील आघाडीबाबत चर्चा सुरू असताना देशाचे पंतप्रधान कोण होतील हा विषय महत्वाचा नाही. तर सामूहिक नेतृत्वाखाली एकजूट होण्याची तयारी सुरू आहे. प्रशांत किशोर हे रणनीतीकार आहेत. ते जे ठरवतील तेच होईल असे नाही. देशात २०१४ मध्ये युपीएच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते. तसेच ( Nawab Malik over opposition alliance ) मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.