मुंबई- शुक्रवारी 12 नोव्हेंबरला नांदेड, मालेगाव आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये (Maharashtra Violence) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागले. शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाकडून जाणून-बुजून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे षडयंत्र असल्याचा असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत केला.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकम्हणाले, की भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस तो बदनाम व्हायला लागतो, त्यानंतर ते आपले शेवटचे हत्यार म्हणून दंगल घडवितात. अमरावतीमध्ये काही तरुणांना पैसे आणि दारू देऊन भाजप नेते अनिल बोंडे यांनी दंगल घडवून आणण्याचे षडयंत्र रचले. या जमिनीसाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात पैसा पोहोचविण्यात आला होता. हिंसाचाराच्या प्रकरणात माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यासह (Ex Minister Anil Bonde Arrest) भाजपमधील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
13 नोव्हेंबरला दंगल घडविण्याचे भाजपकडून जाणून-बुजून षडयंत्र हेही वाचा-Naxals killed in Gadchiroli : पोलीस-नक्षलवाद्यांमधील चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी; माओवाद्यांची मागणी
राष्ट्रवादीचा काँग्रेस केवळ कागदोपत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक या दंगलीत सामील असल्याचा आरोप केला जातो. मात्र तो नगरसेवक फक्त कागदोपत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. 2014 साली त्या नगरसेवकाने एमआयएमसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिले.
हेही वाचा-विशेष मुलाखत : हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला डिवचणे चुकीचे - काँग्रेसचे वरिष्ठ नेते तारीक अन्वर
गृहमंत्रालय तपास करत असून लवकरच पुरावे समोर आणणार
पुढे नवाब मलिक म्हणाले, की अमरावतीमध्ये घडलेल्या दंगली संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पाठपुरावा करत आहेत. याबाबत असणारे सर्व पुरावे लवकरच सर्वांसमोर आणले जातील. तसेच भारतीय जनता पक्ष सर्व मोर्चावर मागे पडत आहे. राज्यात त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे न राहिल्यामुळे शेवटचे हत्यार बनवून राज्यांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. याबाबत राज्य सरकार लवकरच पुरावे समोर आणतील, असा इशाराही नवा मलिक यांनी यावेळी दिला.
हेही वाचा-अन्याय अत्याचाराविरोधात संघर्ष करावा लागेल, अन्यायाविरोधात संघर्ष म्हणजे नक्षलवाद नव्हे - शरद पवार
आशिष शेलार रझा अकॅडमीच्या कार्यालयात...
भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार हे रजा अकॅडमीच्या कार्यालयात ( Ashish Shelar Visit Raza academy) आहेत. त्याबाबतचे फोटोदेखील समोर आले आहेत. त्यामुळे आशिष शेलार रझा अकॅडमीच्या कार्यालयात काय करत होते? याचा खुलासा आशिष शेलार यांनी करावा, असेही यावेळी नाव मलिक म्हणाले. तसेच या दंगलीसाठी जबाबदार असणाऱ्यांना राज्य सरकार सोडणार नाही. या दंगलीमागे कोणतीही संस्था किंवा कोणताही पक्ष असल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.