महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

‘त्या’ कोंबड्यांसाठीच सरकार बनवण्याचे भाकीत; नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार - महाविकास आघाडी सरकार पडेल

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा केला होता. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून, मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला. राणेंच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राणेंवर जोरदार पलटवार केला आहे.

nawab malik and narayan rane
नवाब मलिक आणि नारायण राणे

By

Published : Nov 26, 2021, 5:55 PM IST

Updated : Nov 26, 2021, 6:41 PM IST

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पडेल असे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज केले होते. याला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या आणि बोकड जमले, की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावेच लागते, असा खरमरीत टोला नवाब मलिक यांनी राणेंना लगावला. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी राज्यातील सरकार पडणार नाही. महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

राज्यातले महाविकास आघाडी सरकार पडेल, असे भाकीत वेळोवेळी भाजपच्या नेत्यांनी केली आहेत. राज्यातले सरकार सत्तेवर आले त्यानंतर देवेंद्र फडणवीस सातत्याने हे सरकार पडेल अशी वक्तव्य करत होते. चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही सरकार पडण्याबाबत वक्तव्य केली जाऊ लागली. मात्र, आता सरकार पाडण्याच्या वक्तव्याचा मोर्चा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हाती घेतला आहे, असा खरमरीत टोला मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

  • छापेमारीला आमचे सरकार घाबरणार नाही - मलिक

भाजप केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर छापे टाकत आहे. मात्र, या छापेमारीला राज्यातले सरकार घाबरणार नाही. याबाबतचा कायदेशीर लढा नेतेमंडळी देत आहेत. भाजपने आघाडी सरकारच्या नेत्यांना कितीही त्रास दिला तरी, महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

  • कोरोना असतानाही सरकारने विकासकामे थांबू दिली नाही -

राज्य सरकारला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षाच्या काळामध्ये प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. मात्र, असे असतानाही राज्यातली विकासकामे महाविकास आघाडी सरकारने थांबू दिली नाहीत. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं राहीलं. नव्या रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने उपक्रम राबवले असल्याचे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले.

Last Updated : Nov 26, 2021, 6:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details