मुंबई - नवाब मलिक (Nawab malik) यांनी कार्डिलिया क्रूझ प्रकरणात (cordelia cruise case) नव-नवीन खुलासे करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. या प्रकरणांमध्ये पंच म्हणून असलेला आणि नंतर आरोपी म्हणून अटकेत असलेल्या के पी गोसावी (KP gosavi) याच्या ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून समोर आणले आहेत. एकूण या चार ऑडिओ क्लिपमध्ये (Audio clip) केपी गोसावी एका अज्ञात व्यक्तीशी संभाषण करत आहे. त्यांनी केलेल्या चार ऑडिओ क्लिप मध्ये के पी गोसावी ड्रग्स प्रकरणात संवाद साधत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी तुमच्या माध्यमातून केला आहे.
नवाब मलिकांचा नवा खुलासा : केपी गोसावी आणि अज्ञात व्यक्तीची ऑडिओ क्लिप समोर
कार्डिलिया क्रूज पार्टीचा आयोजक काशिफ खान (Kashiff Khan) याच्या विरोधात पुरावे असूनही त्याला अटक केली जात नाही. काशीफ खान आणि समीर वानखेडे (Sameer wankhede) यांचे काय संबंध आहेत? असा सवाल पुन्हा एकदा राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.
काशीफ खान आणि समीर वानखडेचे काय संबंध?
कार्डिलिया क्रूज पार्टीचा आयोजक काशिफ खान (Kashiff Khan) याच्या विरोधात पुरावे असूनही त्याला अटक केली जात नाही. काशीफ खान आणि समीर वानखेडे (Sameer wankhede) यांचे काय संबंध आहेत? असा सवाल पुन्हा एकदा राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत. ड्रग्स प्रकरणांमध्ये नव्याने काही खुलासा करण्यासंदर्भात नवाब मलिक यांनी आज ट्विट केले होते. त्यानंतर आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीने केलेल्या कारवाईवर त्यांनी बोट ठेवले आहे. आपल्याला केपी गोसावी आणि दिल्लीतील एक खबरी यांच्यातील व्हाट्सअप चॅट हाती लागले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या चॅटमध्ये व्हाईट दुबई (white dubey) नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. दिल्लीच्या खबरी ने केपी गोसावी कडून शिक्षकांचा फोटो का मागवला. मग इतर आरोपींना फोटो बघून ज्याप्रकारे पकडण्यात आलं त्याप्रकारे काशीफ खानला का पकडण्यात आलं नाही? एनसीबीने (NCB) पार्टीमध्ये एवढी मोठी कारवाई करूनही आयोजक आला का ताब्यात घेतलं नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.