महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik on Sanjay Rauts press : संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबतचे पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवली जातील- नवाब मलिक - किरीट सोमैय्या

शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut press meet ) यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यावर बोलताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले, की हळूहळू भारतीय जनता पक्षाची सर्व प्रकरण समोर आणली जातील. आज संजय राऊत यांनी काही घोटाळे समोर आणले आहेत.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Feb 15, 2022, 9:11 PM IST

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर केवळ ( Sanjay Raut press meet ) आरोप केले नाहीत. तर, त्याबाबतचे पुरावेही ते समोर आणतील. ही सर्व प्रकरणे आर्थिक गुन्हे शाखेकडे ( Economic offense wings ) पाठवली जातील. आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार केली जाऊ शकते, असे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यावर बोलताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले, की हळूहळू भारतीय जनता पक्षाची सर्व प्रकरण समोर आणली जातील. आज संजय राऊत यांनी काही घोटाळे ( Sanjay Raut on Kirit Somaiya corruption ) समोर आणले आहेत. किरीट सोमैय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत संजय राऊत यांच्याकडून बऱ्याच गोष्टी समोर आणल्या गेल्या आहेत.
हेही वाचा-Sanjay Raut on BJP : सरकार पाडण्यासाठी भाजपने मदत मागितली होती, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकार 25 वर्षे टिकेल
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून सरकार पाडणे, आमदार-खासदार फोडणे अशी कृत्ये भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला होता. मात्र, जास्त दिवस केंद्रीय तपास यंत्रणेचा असा दुरुपयोग चालणार नाही. संजय राऊत यांनी नाव घेऊन कोण कोणाला त्रास देते याबाबत पत्रकार परिषद सांगितले आहे. याबाबतची कागदोपत्री पुरावेही ते लवकरच समोर ठेवतील.

हेही वाचा-Nilesh Rane Allegations On Vaibhav Naik : आमदार वैभव नाईकांना कुडाळमध्ये गडबड घडवायची होती - निलेश राणे

तपासाच्या नावाखाली लोकांची बँक खाती गोठविली

केंद्रीय तपास यंत्रणेकडून नेत्यांच्या जवळच्या लोकांना त्रास दिला जातो. तपासाच्या नावाखाली लोकांची बँक खाती गोठविली जातात. त्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता महाविकास आघाडी सरकार मधले कोणतेही नेते घाबरणार नाहीत. महाविकास आघाडी सरकार पंचवीस वर्षे टिकेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी बोलून दाखवला.

हेही वाचा-

संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details