मुंबई- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला जात पडताळणी करण्याचा कुठलाही अधिकारी नसुन, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा जात पडताळणी समितीला ते सर्व अधिकार मिळालेले आहेत. तरीही राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने समीर वानखेडे यांच्या जात पडताळणी प्रकरणांमध्ये त्यांना क्लीनचीट दिली. त्यामुळे या प्रकरणावर देखील आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं नवाब मलिक मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
Nawab Malik : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला जात पडताळणी अधिकार नाही - nawab malik press conference
र्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा जात पडताळणी समितीला ते सर्व अधिकार मिळालेले आहेत. तरीही राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने समीर वानखेडे यांच्या जात पडताळणी प्रकरणांमध्ये त्यांना क्लीनचीट दिली. त्यामुळे या प्रकरणावर देखील आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं नवाब मलिक मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
राफेल विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार
मोदी सरकारने राफेल खरेदी विमान प्रकरणात भ्रष्टाचार केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने आवाज उठवला. आता याच प्रकरणात फ्रांस मधून पुन्हा एकदा नवीन माहिती समोर येत असून इंडोनेशिया देशाला राफेल विमान कमी किमतीमध्ये तर भारताला एक विमान जास्त किमतीमध्ये विकण्यात आला असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं पुन्हा एकदा समोर आला आहे. मोदी सरकार मध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. शिपिंग कंपनीकडून बँकांना 21 हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आता समोर आला आहे. या प्रकरणात बॅंकां कडून तक्रारी नंतर कारवाई होणे गरजेचे होते मात्र जाणीवपूर्वक कारवाईत विलंब केला जात असल्याचा संशय नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.