मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना किडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीने नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अप्रत्यक्ष त्याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. (Nawab Malik On NIA ) त्यामुळे आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या डोक्यावर (NIA)ची चौकशीची टांगती तलवार असल्याने नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
इब्राहिम चा भाव इक्बाल कासकर याची देखील चौकशी
कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाले असल्याचे ईडीला संशय आहे. त्या आधारावर ईडीने तपास सुरू केला असता त्यामध्ये दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर चा मुलगा त्याची देखील चौकशी करण्यात आली तसेच दाऊद इब्राहिम चा भाव इक्बाल कासकर याची देखील चौकशी करत सात दिवसाची कस्टडी ईडीने घेतली होती. कुर्ला येथील जमिनी हसीना पारकर कडून घेतल्याने जमिनी घोटाळ्याला अंडरवर्ल्डशी संबंध आल्याने या प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणा नवाब मलिक यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा तपास राष्ट्रीय तपास
राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडी हे संयुक्तरीत्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ह्याच्यासंबंधित झालेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संयुक्त तपास करत आहे. केंद्रीय मंत्रालयाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिल्यानंतर दाऊद इब्राहिम विरोधात UAPA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एनआयए ने मुंबई ईडीच्या साह्याने अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. (Nawab Malik likely to be Inquiry By NIA) त्याच छापेमारी दरम्यान दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर तिच्यासह छोटा शकील चे नातेवाईक सलीम फ्रुट तसेच दाऊद इब्राहिम चा भाऊ इक्बाल कासकर याची देखील चौकशी ईडी ने केली आहे तपासादरम्यान नवाब मलिक यांचे नाव समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा हेदेखील नवाब मलिक यांची चौकशी करण्याची शक्यता
दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर तिच्याकडून नवाब मलिक यांनी कुर्ला येथील घेतलेली जमीन प्रकरणात मलिक यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा हेदेखील नवाब मलिक यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच नवाब मलिक यांच्यावर सुद्धा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मनी लॉन्ड्रिंगच्या हवालामार्फत पैसा पुरोला जात असल्याची माहिती