महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील सर्व लोकांनी शांतता ठेवावी; नवाब मलिकांचे आवाहन - Wasim Rizvi

आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात झालेल्या हिंसेचा कठोर निषेध नोंदवला. त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. त्यावर त्यांनी भाष्य केले.

nawab-malik-j
नवाब मलिक

By

Published : Nov 13, 2021, 11:34 AM IST

Updated : Nov 13, 2021, 1:33 PM IST

मुंबई - क्रूझ ड्रग प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीविरूद्ध भाजपा असे चित्र दिसून येत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेंकावर जोरादर आरोप करत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपाविरोधात आघाडी उघडली आहे. ते दररोज पत्रकार परिषद घेत, गौप्यस्फोट करत असून विरोधकांना लक्ष्य करत आहेत. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात झालेल्या हिंसेचा कठोर निषेध नोंदवला. त्रिपुरातील (Tripura violence) घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. त्यावर त्यांनी भाष्य केले.

नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

ज्या संघटनांनी बंदचा आवाहन लोकांना केलं होत. त्या संघटनेची जबाबदारी होती की, हे आंदोलन शांततेत पार पडावं. एखाद्या घटनेचा निषेध करणे हा लोकांचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करत असताना त्या आंदोलनावर संपूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे. ज्या संघटनांकडून आंदोलन पुकारण्यात आलं. त्यांच्याकडून आंदोलनाबाबतचे नियोजन होणे गरजेच असतं. आंदोलनातून हिंसा होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. मात्र, अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये घडलेली घटना योग्य नसून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर राज्य सरकार कारवाई करेल, असा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. यासोबतच घडलेल्या घटनेनंतर राज्यातील सर्व लोकांनी शांतता ठेवावी तसेच राज्यात कोठेही हिंसा होणार नाही याची दक्षता लोकांनी घ्यावी, असे आवाहन मलिक यांनी केला आहे.

देशातला सलोखा कसा बिघडेल यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वसीम रिजवी वक्तव्य करत आहेत. लोकांची भावना दुखण्याचे काम वसीम रिजवी यांच्याकडून होत असून अद्यापही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. देशातला सलोखा कसा बिघडेल हे वसीम रिजवी यांच्या माध्यमातून नियोजितपणे सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. वक्फ बोर्डाचे चेअरमन असताना रिजवी यांनी अफरातफर केली. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये तक्रारही दाखल आहे. उत्तर प्रदेश मधील सर्व धार्मिक गुरुंनी वसीम रिजवी यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे सर्व प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. देशाचा सलोखा बिघडू नये यासाठी वसीम रिजवी यांना नव्याने कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नये किंवा त्या संबंधित लिखाण करू नये याची दक्षता केंद्र सरकारने ठेवली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा -अमरावती बंदला हिंसक वळण; जमावाकडून दुकानं आणि गाड्यांची तोडफोड

Last Updated : Nov 13, 2021, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details