मुंबईमाजी मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील Bombay Sessions Court विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग Additional Solicitor General Anil Singh यांनी युक्तिवाद केला. त्यादरम्यान, अनिल सिंग यांनी मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध Opposition to Malik bail application कायम दर्शवला असून नवाब मलिक यांनी विकत घेतलेली गोवावाला कंपाउंड जमीन Goawala Compound Land ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Dawood Ibrahim बहीण हसीना पारकरने Haseena Parkar अंडरवर्ल्ड कनेक्शन वापरून बळकावली होती. असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला आहे.
याचिकेवर पुढील सुनावणी 6 सप्टेंबर रोजी होणारअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या Dawood Ibrahim नावाने धमकी देऊन कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड जमीन Goawala Compound Land बळकावली होती असा युक्तिवाद कोर्टात ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. कुर्ला येथील जमीन नवाब मलिक यांनी विकत घेतली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार Financial malfeasance झाला असल्याचं ईडीकडून सांगण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांच्या जबाबाचा अहवाल युक्तीवादादरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टात दिला आहे.