महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sana Malik Tweet : फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्बला नवाब मलिकांच्या मुलीचे प्रत्युत्तर; लांबेंसोबतचा फोटो ट्विट - देवेंद्र फडणवीस डॉक्टर लांबे फोटो ट्विट

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वक्फ बोर्डाच्या सदस्याबाबत (Waqf Board) विधानसभेत पेनड्राइव्ह सादर केला आहे. यातील काही व्यक्ती दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा उल्लेख आहे. मात्र, हे आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांची मुलगी सना मलिक शेख (Sana Malik-Shaikh) यांनी फेटाळून लावले आहेत.

lambe and fadnavis
डॉ. लांबे आणि देवेंद्र फडणवीस

By

Published : Mar 15, 2022, 6:19 PM IST

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वक्फ बोर्डाच्या सदस्याबाबत (Waqf Board) विधानसभेत पेनड्राइव्ह सादर केला आहे. यातील काही व्यक्ती दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा उल्लेख आहे. मात्र, हे आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांची मुलगी सना मलिक शेख (Sana Malik-Shaikh) यांनी फेटाळून लावले आहेत. सना मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुदस्सर लांबे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच १३ सप्टेंबर २०१९ रोजी डॉ. लांबेंची नियुक्ती झाली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली, असे सना यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • काय आहे सना मलिक यांचे ट्विट?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच १३ सप्टेंबर २०१९ रोजी डॉ. लांबे यांची नियुक्ती झाली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक/वक्फ विभाग मिळाला, असे सना मलिक यांनी स्पष्ट केले.

  • काय आहेत फडणवीस यांनी केलेले आरोप?

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या पेनड्राईव्ह बॉम्बने महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली असल्याची चर्चा आहे. या पेनड्राईव्हमध्ये वक्फ बोर्डाच्या सदस्यांचे व्हिडिओ संभाषण आहे. यात दोन व्यक्ती असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यातील एकाचे नाव मोहम्मद अर्शद खान, तर दुसऱ्याचे नाव डॉक्टर मुदीस्सर लांबे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच या दोघांना वक्फ बोर्डावर नियुक्त करण्यात आले आहे. एका महिलेने या दोघांपैकी मुदीस्सर लांबे याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती, मात्र, तरीही त्याला अटक केली नाही. मात्र, महिलेच्या पतीला चोरीच्या आरोपातून अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर लांबे यांचे दाऊदशी संबंध असून, वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात मोठा घोटाळा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details