महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik Case Hearing नवाब मलिक यांनी तपासादरम्यान दोनदा जबाब बदलला; ईडीचा मुंबई सत्र न्यायालयात युक्तिवाद - Nawab Malik ED investigation

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील ( Nawab Malik bail application Mumbai Session Court ) विशेष पीएमएलए कोर्टामध्ये ( Nawab Malik plea in PMLA Court ) ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. त्यादरम्यान अनिल सिंग यांनी असे म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी आतापर्यंत दोन वेळा तपासा दरम्यान जबाब बदलला ( Nawab Malik changed statement ) आहे. मुनीर पटेल यांच्याकडून घेतलेली जमीन कुठलीही शहानिशा करून मलिक यांनी खरेदी केली नव्हती, असा देखील युक्तिवाद ईडीच्या वतीने आज करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांनी तपासादरम्यान दोनदा जबाब बदलला
नवाब मलिक यांनी तपासादरम्यान दोनदा जबाब बदलला

By

Published : Sep 6, 2022, 4:42 PM IST

मुंबई-माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील ( Nawab Malik bail application Mumbai Session Court ) विशेष पीएमएलए कोर्टामध्ये ( Nawab Malik plea in PMLA Court ) ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. त्यादरम्यान अनिल सिंग यांनी असे म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी आतापर्यंत दोन वेळा तपासा दरम्यान जबाब बदलला ( Nawab Malik changed statement ) आहे. मुनीर पटेल यांच्याकडून घेतलेली जमीन कुठलीही शहानिशा करून मलिक यांनी खरेदी केली नव्हती, असा देखील युक्तिवाद ईडीच्या वतीने आज करण्यात आला आहे. या अर्जावर पुढील सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे.


तरच अर्जावर सविस्तरपणे सुनावणी -मुनीर पटेल यांच्याकडून पावर ऑफ अटरणीवर करण्यात आलेली सहीही त्यांनीच केली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही आहे. मुनीर पटेल यांनी सही केले असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहे. नवाब मलिक यांनी खरेदी केलेल्या जमीन संदर्भात कुठलीही माहिती न घेता कशी काय खरेदी केली असा प्रश्न देखील यावेळी ईडीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. मात्र नवाब मलिक यांना खरंच अद्यापही उपचाराची गरज आहे की नाही, या करिता न्यायालयाने कमिटी स्थापन करायला पाहिजे. या कमिटीच्या अहवालानंतर जर नवाब मलिक यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता असल्यास ईडीची कुठलीही हरकत नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टासमोर आज केला. त्यावर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी असे म्हटले की, यासंदर्भात ईडीने लेखी अर्ज करावा. जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या अर्जावर सविस्तरपणे सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने ईडीला म्हटले आहे.

गोवावाला कंपाउंड खरेदीतील आर्थिक गैरव्यवहार भोवला -गोवावाला कंपाउंड खरेदी आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.



नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?
नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details