महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik Arrested : शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली - ईडीने नवाब मलिकांना केली अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) अटक केली ( Nawab Malik Arrested ) आहे. त्यानंतर सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी मोठे राष्ट्रवादीचे मोठे नेते दाखल झाले होते. ही बैठक आता संपली आहे.

sharad pawar
sharad pawar

By

Published : Feb 23, 2022, 5:34 PM IST

Updated : Feb 23, 2022, 7:11 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीने ही अटकेची कारवाई केली ( Nawab Malik Arrested ) आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीचे मोठे नेते दाखल झाले होते. आता ही बैठक संपल्याची माहिती मिळत आहे.

सिल्वर ओक निवासस्थानाबाहेरुन प्रतिनिधीने घेतलेला आढावा

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री धनंजय मुंडे बैठकीस उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्याचसोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सुनील केदार यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेऊन एकंदरीत सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक होणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक

Last Updated : Feb 23, 2022, 7:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details