महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही"

कला आणि अभिनय याला कोणताही धर्म नसतो. यामुळे त्याला धर्माचा चष्मा लावणे योग्य नसल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र भाजपाला प्रत्येक गोष्टीत धर्माचा चष्मा लावून पाहण्याची सवय झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

nawab malik on BJP
'कला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही"

By

Published : Nov 30, 2020, 7:02 PM IST

मुंबई - कला आणि अभिनय याला कोणताही धर्म नसतो, यामुळे त्याला धर्माचा चष्मा लावणे योग्य नसल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र भाजपला प्रत्येक गोष्टीत धर्माचा चष्मा लावून पाहण्याची सवय झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

'कला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही"
शिवसेनेने राज्यभरात अजान स्पर्धा आयोजित केली असून त्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे धर्माचा मुद्दा उपस्थित करून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. याची दखल घेत मलिक यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. राज्यभरात शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. मागील अनेक वर्षांमध्ये सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या गीतापठण, गीता वाचन तसेच संस्कृतच्या श्लोक आदी स्पर्धांमध्ये मुस्लीम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही परिस्थिती भाजपाला माहित नाही. यामुळे त्यांना पुन्हा एकदा आपण आठवण करून देत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

कला आणि अभिनयाला धर्म नसतो. त्यामुळे कलावंत कोणत्याही धर्माचा नसतो. मात्र त्याकडे धर्माच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. आपल्या देशात दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी अनेक सिनेमांमध्ये हिंदू धर्माच्या संदर्भातील अनेक चांगल्या भूमिका मांडल्या आहेत. तसेच मंदिरांमध्ये जाऊन अनेक प्रकारचे चित्रीकरण आणि अभिनय देखील केला आहे. याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केले, असा होत नाही, हे नवाब मलिक यांनी अधोरेखित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details