मुंबई :आजपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु झाला (Navratri festival 2022) आहे. याच नवरात्री उत्सवादरम्यान आपण ईटीव्ही भारतच्या माध्यमातून कर्तृत्ववान आणि जिगरबाज महिलांचा खडतर प्रवास जाणून घेणार (Navratri special) आहोत. युनियन ट्रस्ट ऑफ इंडियाच्या ३२ कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्य़ाची उकल, मुद्रांक घोटाळ्यातील तपास, सिने अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या हत्येचा तपास, २०११ मध्ये हैदराबादहून मुंबईला आलेला १ कोटी ४५ लाख किमतीचे हिरे व सोन्याचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत करणं, दुबईच्या रोशन अन्सारीला नाटय़मय अटक करणं, साकीनाका परिसरातील बलात्कार आणि हत्येचा तपास इतकं नव्हे तर ‘मर्दानी’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला तालीम देणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम (Jyotsana Rasam gave Rani Mukherjee training) आहेत.
भ्रूणहत्येच्या विरोधात रासम यांची धडाकेबाज कामगिरी -भ्रूणहत्येच्या विरोधात ११ दिवसांत १३ राज्यांमध्ये ६५८० किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने करून सर्वात वेगवान महिला (फास्टेस्ट वूमन) म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असणाऱ्या रासम यांची कामगिरी धडाकेबाज आहे. ३४ वर्षांच्या सेवेनंतर आता त्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. दुबईमध्ये आपल्या सावत्र मुलाची हत्या करून भारतात पळून आलेल्या रोशन अन्सारीचा शोध घेण्याची जबाबदारी सीबीआयकडे होती. २००२ साली त्या ‘सीबीआय’मध्ये कार्यरत असलेल्या नीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली ज्योत्स्ना रासम यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता रोशन पूर्ण देशात हवाई मार्गाने फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सातत्याने तिचा माग काढत असताना, ती मुंब्य्रात तिच्या आईकडे आल्याची खात्रीलायक माहिती सीबीआयला मिळाली. पथकाने पूर्ण तयारी करून तिथे छापा मारण्याचे ठरवले आणि आरोपीच्या मुसक्या (Navadurga Jyotsana Rasam) आवळल्या.
परिस्थिती जेमतेम पण प्रचंड कौटूंबिक आधार -रासम या ३० वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाल्या होत्या. आज डी एन नगर परिसरात सहायक पोलीस आयुक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल यशस्वी केली आहे. वांद्र्यातील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या ज्योत्स्ना रासम यांचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल आणि चेतना महाविद्यालयात झालं आहे. त्यांचे वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची. त्यांचे संपूर्ण शिक्षण आई-वडिलांनी केलं, कधीही आबाळ होऊ दिलं नाही, असं ज्योत्स्ना रासम (Navratri special Navadurga) सांगतात.