मुंबई :मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सव सुरू आहे. त्यातच मुंबईतील अनेक ठिकाणी गरबा दांडियाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज असे म्हटले आहे की, देवी शक्तीची पुजा करण्यासाठी ध्यान आणि एकाग्रतेची आवश्यकता (Navratri is festival of worshiping Adishakti) असते. त्यामुळे गरबा आणि दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकर आदी आधुनिक साऊंड सिस्टिम वापरण्याची गरज नाही. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले (High Court observation) आहे.
नवरात्रोत्सवासाठी ध्वनी उपकरणांवर बंदी -मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी दरम्यान असे म्हटले आहे. ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत सायलेंट झोन म्हणून घोषीत केलेल्या खेळाच्या मैदानावर चालू असलेल्या नवरात्रोत्सवासाठी ध्वनी उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्याच्या आदेशाची विनंती करणाऱ्या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले (Navratri festival 2022) आहे.