मुंबई :नवरात्रीची सुरुवात झाली आहे. घटस्थापना होऊन लोक आपापल्या रोजच्या पूजेला आणि नवरात्रीच्या विविध आरत्यांमध्ये रमलेले आहेत. गरबा देखील सुरू झाला आहे. मात्र गरब्यासाठी ठीकठिकाणी विशिष्ट नियम आणि विशिष्ट अडथळे युवकांना वाटत होते. त्यातही मराठी व इतर भाषिक अशा युवकांनी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उस्फुर्तपणे गरब्याला सुरुवात (Metro Garba of multi lingual youth) केली. मरीन ड्राइवर मंत्रालयाच्या जवळ समुद्राच्या किनारी हा उत्स्फूर्त गरबा रंगला (Metro Garba of multi lingual youth on Marine Drive) आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.
Navratri festival 2022 : मरीन ड्राइववर रंगला 'मेट्रो गरबा' ; विविध भाषिक युवकांचा 'असा'ही गरबा - मेट्रो गरबा
नवरात्रीची सुरुवात झाली आहे. मराठी व इतर भाषिक अशा युवकांनी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उस्फुर्तपणे गरब्याला सुरुवात (Metro Garba of multi lingual youth) केली आहे. मरीन ड्राइवर मंत्रालयाच्या जवळ समुद्राच्या किनारी हा उत्स्फूर्त गरबा रंगला (Metro Garba of multi lingual youth on Marine Drive) आहे.
विविध भाषिक युवकांचा गरबा -या गरब्याच्या संदर्भात, जातीन शहा केसी कॉलेजमधील विद्यार्थी याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितलं की, आम्ही गरब्याला जाण्याचा विचार करत (Metro Garba at Marine Drive) होतो. मात्र अनेक ठिकाणी गरब्याकरिता वेगवेगळे नियम, ठराविक वेळ आणि अटी होत्या. त्यापेक्षा मुंबईमध्येच वेगवेगळ्या भाषेतले तरुण जर एकत्र आलो. ही चांगली गोष्ट आहे. म्हणून काही लोकांनी पुढाकार घेतला. आणि वेगवेगळ्या कॉलेजेची मुलं, युवक, विद्यार्थी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणचे तरुण-तरुणी एकत्र येत, हा गरबा (Navratri festival 2022) केला.