महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Vs Rana : राणा दाम्पत्याचे आव्हान, मुख्यमंत्री ठाकरे 'मातोश्री'वर दाखल, शिवसैनिकांना परतण्याचे आवाहन - मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीवर दाखल

राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान ( Ravi Rana Hanuman Chalisa Recite ) दिले होते. त्यानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक जमले आहेत. त्यातच मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले ( CM Uddhav Thackeray Reached At Matoshri ) आहेत.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

By

Published : Apr 22, 2022, 6:33 PM IST

Updated : Apr 22, 2022, 10:09 PM IST

मुंबई -राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. त्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान ( Ravi Rana Hanuman Chalisa Recite ) दिले. त्यानंतर मातोश्रीसमोर शेकडो शिवसैनिक जमा झाले होते. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीवर दाखल झाले ( CM Uddhav Thackeray Reached At Matoshri ) आहेत. यावेळी त्यांनी शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचा आवाहन केले.

रवी राणांनी हनुमान जयंतीदिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी पठण नाही केल तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार येथील आपल्या निवासस्थानी आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे 'मातोश्री'वर दाखल

राणा दाम्पत्याने आव्हान दिल्यानंतर आज ( 22 एप्रिल ) मातोश्रीबाहेर शेकडो शिवसैनिक जमा झाले आहेत. खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर, आमदार मनीषा कायंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे देखील मातोश्री बाहेर आले आहेत. शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना हात उंचावून आणि नमस्कार करुन आभार मानले आहेत. यावेळी कार्यकर्त्यामध्ये एकच उत्साह पहायला मिळाला आहे.

पठण करणारच - कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या ( 23 एप्रिल ) सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत. जर, हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरेंनी हनुमान चालीसाचे पठण केले असते. तर, आता जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे, जी शिवसैनिकांची भूमिका रस्त्यावर उतरलेली आहे, ते चित्र दिसले नसते. विशेष म्हणजे मुंबईत आल्यावर मला पाय ठेवू देणार नाही, असे सांगणारे शिवसैनिक चक्क मी माझ्या पत्नीसह मुंबई पोहचलो. तरी, सुद्धा त्यांना थांगपत्ता लागला नाही, अशी माहिती रवी राणा यांनी दिली आहे.

हेही वाचा -Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार

Last Updated : Apr 22, 2022, 10:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details